स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 08 ऑगस्ट 2024) -
गडचिरोली कडून गोंडपिपरी बल्लारशाह मार्गे जनावरांची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. आज सकाळी 08 वाजताच्या दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी मध्ये गोंडपिपरी कडून दोन ट्रक संशयीतरित्या येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र ट्रक चालकांनी न थांबवता पळून गेले. पोलिसांनी दोन्ही ट्रकचा पाठलाग केला. दोन्ही ट्रक चालकांनी ट्रक रोड साईड ला लावून जंगलाचे दिशेने पळून गेले. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेत दोन्ही ट्रक मधून एकूण 77 गोवंशाची मुक्तता केली. सदर कारवाईत 57 लाख 70 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, पो.हवा. दिपक डोंगरे, नापोशि संतोष येलपुलवार, पो.शि. नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, अमोल सावे, वैभव पत्तीवार यांनी केली.
दि. 07 ऑगस्ट ला गोंडपिपरी पोलिसांकडून हि नाकाबंदी करत एका ट्रक मधून 44 गोवंश जनावरांची सुटका करत 14 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. गडचांदूर पोलिसांनी नाकाबंदी करत एका ट्रक मधून 34 गोवंश जनावरांची सुटका करत 21 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयाचा पदभार स्विकारला तेव्हा पासुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन यांचे कारवाईत अवैध गोवंश जनावर वाहतूकीचे एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 1412 गोंवश जातीच्या जनावरांची मुक्तता करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यामार्फत संपूर्ण जिल्हयात 8 कोटी 27 लाख 39 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #crime #Cattlesmuggling #LocalCrimeBranch #CrimeBranch #Blockade #Truck #Emancipationofcattle #police #SuperintendentofPolice #AdditionalSuperintendentofPolice #PoliceInspector #maheshkondawar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.