आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 ऑगस्ट 2024) -
स्थानिक न्यू एरा इंग्लिश शाळेतील गरजवंत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना रोटरी क्लब राजुराच्या वतीने स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब समाजातील विविध वर्गातील लोक एकत्र येऊन "आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो" या उद्देशाने उपक्रम राबवतात. संस्थेद्वारे समाजसेवेमध्ये योगदान देण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येते.
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व चांडक कृषी केंद्राचे संचालक राजेंद्रजी चांडक यांनी या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. राजेंद्रजी चांडक हे राजुरा शहरातील दानशूर व्यक्ती असून ते नेहमी असे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या संकल्पनेतून न्यू एरा इंग्लिश शाळेच्या गरजवंत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना 50 स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लब राजुराचे माजी अध्यक्ष कमल बजाज, सचिव निखिल चांडक, सदस्य किरण ढुमणे, अमोल कोंडावार, नवल झंवर, ऋषभ गोठी, निखिल शेरकी, किशोर हिंगाणे, विनोद चन्ने, अर्पणा बजाज, पूनम गिरसावळे, वैशाली हिंगाणे व न्युज एरा इंग्लिश शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक गंगशेट्टीवार, शिक्षिका विना देशकर, ज्योती कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #school #NewEraEnglishSchool #RotaryClubRajura #Schoolbag #theneedy #Socialactivities #chandakkrushikendra #Acharitableperson
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.