रेती व गोवंश तस्करांवर कारवाई करण्याची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 ऑगस्ट 2024) -
पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयाचा पदभार स्विकारला तेव्हा पासुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन यांचे कारवाईत अवैध गोवंश जनावर वाहतूकीचे एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले. 1412 गोंवश जातीच्या जनावरांची मुक्तता करण्यात पोलिसांना यश मिळाले. यामार्फत संपूर्ण जिल्हयात 8 कोटी 27 लाख 39 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी पोलिसांनी अशीच तत्परता दाखवत जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांपाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांना आवरण्यात कौतुकास्पद कार्य केले. मात्र हे सगळं करत असताना मागील कित्येक काळापासून अवैध धंद्याचे माहेरघर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन कडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष असल्याचेही दिसून येत आहे. राजुरा तालुक्यातील तसेच विरूर परिसरातील रेत माफिया रेती तस्करीच्या जोरावर गब्बर झाले आहे. यातील काही रेत माफिया राजकारणात असून त्यांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. बोट दाखवणाऱ्याची मनगूट मोडून टाकण्याची शक्ती यांच्या कडे असल्याने काही पोलिसही हतबल असल्याचे दिसून येत आहे. याच धाकावर अवैध रेती व गोवंश तस्करी जोमात सुरू आहे. रेती तस्करीवर आळा घालण्याचे काम एकट्या पोलिसांचे नाही वास्तविक हे काम खनिकर्म सोबतच महसूल विभागाचे आहे मात्र दोन्ही विभागाचेही याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.
विरूर स्टेशन मार्गे गोवंश तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मध्यन्तरी यावर आळा बसला होता मात्र आता पुन्हा या मार्गाने तेलंगणाकडे गोवंश तस्करी होत असल्याची बाब उजेडात आली आहे. पोलीस अधिक्षक व स्थानिक गुन्हे शाखेने विरूर स्टेशनला अवैध धंद्याचे ठिकाण बनविणाऱ्या रेत व गोवंश तस्करांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #wirurstation #wirurpolicstation #Cattlesmuggling #sandsmuggling #CrimeBranch #SuperintendentofPolice #rajurataluka #Illegalbusiness #MinesDepartment #RevenueDepartment
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.