Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर कोल वॉशरीज कामगार संघटनेच्या आंदोलनाला मिळाले यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२० कामगारांना तत्काळ नोकरी उर्वरित १८ कामगारांना तीन महिन्यांत सामावून घेण्याचे आश्वासन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०९ ऑगस्ट २०२४) ...
२० कामगारांना तत्काळ नोकरी
उर्वरित १८ कामगारांना तीन महिन्यांत सामावून घेण्याचे आश्वासन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ ऑगस्ट २०२४) -
        महा मिनरल मायनिंग अँड बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड (गुप्ता कोल वाशरिज, गोवारी/बाबापुर) येथे कार्यरत असलेल्या कामगारांची समस्या अखेर साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुटली आहे. ५ ऑगस्टपासून कोल वाशरिज कामगार संघटनेने आपल्या मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणामुळे कामगारांच्या समस्या आणि मागण्या सार्वजनिक चर्चेत आल्या, ज्यामुळे प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने लक्ष घातले. या उपोषणाच्या यशामुळे ३८ पूर्वीच्या कामगारांना कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. (maha mineral mining and beneficiary private limited)

        सदरील निर्णय ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी मध्यस्थी केली होती. बैठकीत महा मिनरल मायनिंग अँड बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (पूर्वीची गुप्ता कोल वाशरिज) व्यवस्थापक मोहन रुघानी आणि कोल वाशरिज कामगार संघटनेचे महासचिव रवींद्र वाढई उपस्थित होते. बैठकीत ३८ कामगारांच्या पुनर्नियुक्तीवर सहमती झाली, ज्यापैकी २० कामगारांना तत्काळ कामावर घेण्यात येणार आहे, तर उर्वरित १८ कामगारांना तीन महिन्यांच्या आत सामावून घेण्याचे आश्वासन कामगार आयुक्त, चंद्रपूर यांच्या समोर देण्यात आले.

        गुप्ता कोल वाशरिज, गोवारी/बाबापुर येथे काम करणारे ३८ कामगार अचानक बेरोजगार झाले होते. या कामगारांनी आपली नोकरी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी कोल वाशरिज कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये कामगारांनी आपल्या हक्कासाठी आणि नोकरीच्या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवला. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चेत कामगारांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेण्यात आली. सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी दोन्ही बाजूंमध्ये संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. महा मिनरल मायनिंग अँड बेनिफिशिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या समजून घेतल्यावर, त्यांनी तत्काळ २० कामगारांना नोकरीवर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. उर्वरित १८ कामगारांना येत्या तीन महिन्यांत कंपनीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. कंपनीचे व्यवस्थापक मोहन रुंगानी, विशाल इंगळे यांनी उपोषणकर्ते मोरेश्वर देठे, मंगेश गौरकार, दिलीप काळे, राजकुमार बांदूरकार यांना निंबू पाणी देत उपोषण सोडविले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी आसुटकर, उपाध्यक्ष हनुमान करडभुजे, विनोद साळवे, संजय गोरे, माधव पेरकंडे, शत्रूघन पेटकर तसेच कामगार उपस्थित होते. (Gupta Coal Washridge Gouri Babapur)

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #Coalwasheries #laborunion #CoalWasheriesWorkersUnion #mahamineralminingandbeneficiaryprivatelimited #Companymanagement #Administration #hungerstrike #job #AssistantLaborCommissionerChandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top