गोंडपिपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) -
गोंडपिपरी येथे दिनांक 4 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सर्वांचे यावेळी स्वागत करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांंनी भुषविले. यावेळी प्रमुख अतिथी जि.प. माजी सभापती निळकंठ कोरांगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शालिकराव माऊलीकर, ॲड.प्रफुल्ल आस्वले, रामकृष्ण सांगळे, प्रकाश काळे, सुरेश चरडे, मनोज कोपावार, आनंद खर्डीवार, मारोतराव भोयर, मालनताई दुर्गे, कमलाकर, खोब्रागडे, मधू चिंचोलकर, सतपालसिंग डांगी आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी आणि जोगापूर येथील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाशराव काळे, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी दिलीप वासेकर, मारोती जुवारे, विनायक रामगिरवार, विजय झाडे, सुरेश सातपुते, अंकुश बुरेवार, राजकुमार चहाकाटे, पुरुषोत्तम पेंढारकर, शेखर सातपुते इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या बैठकीला शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्रांतीदिनाच्या पाडव्याला दिनांक 10 ऑगस्ट रोजी नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविण्याच्या आंदोलनात गोंडपिपरी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जाण्याचा निर्णय घेण्यात आला. (Protests to hoist the flag of independent Vidarbha state on Vidhan Bhavan in Nagpur)
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #shetkarisanghtna #advwamanraochatap #10thAugustkrantidin #krantidin #VidhanBhavan #IndependentStateofVidarbha #flag
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.