Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या - मा.आमदार अँड. संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व्दारा महिला संवाद मेळावा आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. १५ ऑगस्ट २०२४) -         शासन जनसा...
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व्दारा महिला संवाद मेळावा आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. १५ ऑगस्ट २०२४) -
        शासन जनसामान्य लोकांच्या हितासाठी सदैव तत्पर असून शासनाच्या कल्याणकारी योजनाचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी अध्यक्षीय भाषणात अनुलोम व्दारा आयोजित महिला संवाद मेळाव्यात केले. केंद्र सरकार तथा राज्य शासनाच्या योजनांच्या अवलोकनासाठी अनुलोम व्दारा महिला संवाद मेळावा राजुरा येथील संत नगाजी भवन येथे घेण्यात आला. महिलांनी आत्मनिर्भर होण्याकरिता स्वतःमध्ये असणारे कौशल्य विकसित करुन स्वयंपुर्ण व्हावे असे आवाहन मेळाव्याचे उद्घाटक असणाऱ्या उद्योजक निलेश ताजणे यांनी आपल्या भाषणात महिला संवादिनींना केले.

        अनुलोम समन्वयक सतिश मुसळे यांनी अनुलोम कार्यमिमांसा प्रास्ताविकेत स्पष्ट केली. यावेळी चंद्रपुर उपविभाग प्रमुख सुनिल दालवनकर यांनीही अनुलोमचे सामाजिक कार्य विशद केले. कार्यक्रमाला माजी आमदार संजय धोटे, युवा उद्योजक निलेश ताजणे, सामाजिक कार्यकर्ते अँड. इंजि. प्रशांत घरोटे, उपविभाग प्रमुख सुनिल दालवनकर, जनार्दन निकोडे, राजुरा अनुलोम समन्वयक सतिश मुसळे, कुणाल पारखी, भाग जनसेवक चंपत चहारे, संवादिनी संगिता होकम, संवादिनी शुभांगी थेरे, दिपाताई येल्ला, सरिता कोंडावार, कांचन यमनुरवार, मिनाक्षी रागीट, ललिता पिंपळकर, शुभांगी खोंड, मनिषा मोहितकर, स्वाती टिपले यांचे सह राजुरा नगरातील बहुसंख्य मातृशक्ती संवादिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदाताई वाटेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन कांचन यमनुलवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनुलोम टिमचे विशेष सहकार्य लाभले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #ExMLA #SanjayDhote #LokrajMahaAbhiyan #OrganizeWomen'sDialogueMeeting #mahilasanvadmelava #coordinator #CentralGovernmentSchemes #StateGovernmentSchemes #SantNagajiBhavanRajura #Socialworkers

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top