गडचांदूर - भोयगाव मार्गे चंद्रपूर रस्त्यावरील घटना
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 13 ऑगस्ट 2024) -
गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावरील निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ आज 13 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिवती तालुक्यातील 5 तरुण MH-04 FR-4081 या अर्टिगा कारने चंद्रपूर वरून गडचांदूर कडे येत असताना गडचांदूर पासून अवघ्या 5 ते 7 किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-18 N-6656
ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज गव्हाले वय 22 रा. शेणगाव, सुनील किजगीर वय 27 रा. शेणगाव, आकाश पेंदोर 22 रा. पाटण, श्रेयश पाटील वय 22 रा. टाटाकोहोड ह्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय गायकवाड रा. कोलामगुडा हा गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळतात गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठविले व गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविले मात्र तो तरुण गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेमुळे जिवती तालुक्यातील तीन गावात शोककळा पसरली असून गावाचे वातावरण शोकाकुल झाले आहे.
मागच्या आठवड्यात सुद्धा याच मार्गावर उभ्या ट्रकला धडक दिल्याने दोन जणांच्या मृत्यू झाला होता. परत रात्री अशीच पुनरावृत्ती झाल्याने मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोक संतापले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करत उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन मध्ये आणले व रास्ता खुला रहदारीस केला. समोरील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #Jivati Taluka #ViaGadchandurBhoigaonRoad #accident #GadchandurPoliceStation #NimaniLakhmapurroute #Aspeedingcarhitastandingtruck #track #Car #4youthskilled #police
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.