लोडर कामगारांच्या आंदोलनाला दत्तक बारा गावातील सरपंचांचा पाठिंबा
आज नांदा फाटा बाजारपेठ बंद
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १३ ऑगस्ट २०२४) -
अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे एल अँड टी कामगार संघटना व विजय क्रांती कामगार संघटना या दोन कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर शुक्रवार रात्र पासून व्यवस्थापनाने नियमित कामगारांना कर्तव्यावर प्रवेश नाकारात कामगारांच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावत आजूबाजूच्या कारखान्यामधून उसनवार पद्धतीने मजूर आणून सिमेंट डिस्पॅच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र व्यवस्थापनाचा हा प्रयत्न नियमित कामगारांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करीत हाणून पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून कंपनीमध्ये होत असलेल्या लोडर भरतीमध्ये व्यवस्थापना अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावातील युवकांना सामावून घेण्यासाठी सरपंच संघटनांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. ज्यामुळे लोडर भरतीत काही प्रमाणात दत्तक गावातील युवकांना घेण्यात आले. मात्र अल्पावधीतच त्यांना आपल्या रोजी रोटीला मुकावे लागते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून मागील सहा महिने ते एक वर्षभरापासून कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी वास्तविक कोणतीही चौकशी न करता दहा लोकांना निलंबनाच्या नोटिसी सुद्धा देण्यात आली. ज्यामुळे कामगारांमध्ये भीती सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अन्याय कुठपर्यंत सहन करणार...? शेवटी कामगारांच्या अन्याय सहन करण्याचा बांध सुटला व त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बारा गावातील सरपंचांनी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत स्वतः आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर कंपनी प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाची दखल नांदाफाटा परिसरातील व्यापाऱ्यांनी घेतली असून आज मंगळवारी संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निश्चय केला आहे. आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सिमेंट डिस्पॅच बंद असल्याकारणाने कारखान्याचे सुद्धा कोट्यावधीचे दिवसागणिक नुकसान होत आहे. आज घडीला केवळ कॅप्सूल ट्रकच्या माध्यमातून सिमेंट बाहेर पडत आहे मात्र यामुळे कंपनीचे सीमेंट उत्पादन कधीही बंद होऊ शकते. असे झाल्यास कंपनीचे अब्जावधी रुपयाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीतील कार्यरत अधिकारी कामगारांच्या हिताचे किंवा कारखान्याच्या हिताची काही पडलेले नसून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेल्या निर्देशाची आता काय दखल घेतली जाईल याकडे सर्व कामगार व परिसरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #sarpanchsanghatna #adoptedvillage #UltratechCement #TradeUnions #entrancegate #Recruitloader #managment #Fastingtodeath #suspended #workers #CementDispatchoff #Marketclosed #GuardianMinister #L&TLaborUnion #VijayKrantiLaborUnion
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.