Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रत्येकाला आपण स्वतः आणि त्यासोबतच आपलं कुटुंब निरोगी राहावं असं वाटत - भैय्याजी येरमे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेकडो लोकांनी घेतला फुल बाॅडी चेकअप कॅम्प चा लाभ यहोवा यिरे फाऊंडेशनचा उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १२ ऑगस्ट २०२४) -       ...
शेकडो लोकांनी घेतला फुल बाॅडी चेकअप कॅम्प चा लाभ
यहोवा यिरे फाऊंडेशनचा उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ ऑगस्ट २०२४) -
        प्रत्येकाला आपण स्वतः आणि त्यासोबतच आपलं कुटुंब निरोगी राहावं असं वाटत असतं निरोगी राहण्यासाठी जीवनशैली आणि आहार तेवढा महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्वाचे शरीराची नियमित तपासणी देखील महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण शरीर निरोगी राहावे यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे शरीराची देखील नियमित तपासणी करणे आवश्यकता आहे असे म्हटले जाते की उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला ही बाब लक्षात घेत प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कौशल्य विकास चंद्रपुर चे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले.

        यहोवा यिरे फाऊंडेशन व ESK हेल्थ स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क संपूर्ण बाॅडी फॅट चेकअप कॅम्प चे आयोजन यहोवा यिरे फाऊंडेशन हाॅल येथे करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये शेकडो लाभार्थ्यांनी बॉडी चेकअप चा लाभ घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे DYSP सौ. मंजुषा भोसले, कौशल्य विकास चे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, डायरेक्टर इन एजुकेशन सिनियर वेल्फेअर कोच डाॅ.कल्पना बन्सोड, वेल्फेअर कोच सौ. रंजिता फुलझेले, यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते. 

        संपूर्ण बॉडी चेकअप च्या सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील कोणताही आजार किंवा समस्या यामुळे वेळेत ओळखले जाऊ शकतात. त्यामुळे त्या आजारावर वेळीच उपचार करून प्रतिबंध केला जाऊ शकतो. बहुतेक संपूर्ण शरीर तपासणीमध्ये डॉक्टर प्रथम व्यक्तीचे वजन नंतर उंची मोजतात यानंतर शरीरातील रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या पातळी सर्व हृदयाची ठोके मोजले जातात यानंतरच डॉक्टरांकडून संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात येतो. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांनी ह्या कॅम्प चे आयोजन केले होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #helth #Fullbodycheckup #healthyfamily #HealthCheck #BhaiyyajiYerme #AssistantCommissionerofSkillDevelopmentChandrapur #JehovahYireFoundation #ESKHealthStudio #DYSP #ManjushaBhosale #DirectorinEducationSeniorWelfareCoach #DrKalpanaBansod #WelfareCoach #RanjitaBansod #JehovaYireFoundationPresidentElijahBorkute #DrRameshKumarBorkute

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top