आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ ऑगस्ट २०२४) -
वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्णवाहिका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे. मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासिक वेतन देत नसून या रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून या वाहन चालकांचे वेतन रखडले असून यांच्यावर कुंटुबाचे उदनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. हाईप्राईड या कंपनीचे कंत्राटदार जाणीवपूर्वक या रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाकडे दुर्लक्ष करीत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेकोलिने आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून हाईप्राईड या कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द करून रुग्णवाहिका वाहनचालकांना दिलासा द्यावा अश्या आशयाचे निवेदन वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकाला आठ दिवसा पूर्वी देण्यात आले होते मात्र संबधीत कंपनीने यावर लेखी स्वरुपात आश्वास्त करून तुम्ही ओळखले की नाही ओळखत आणि झालेल्या चुकीचा माफीनामा देत सदर रुग्नवाहिका चालकांना नियमीत व महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन देणार असल्याचे स्पष्ट केले असल्याने रुग्णवाहिका चालकांच्या प्रंबलीत मागण्या पूर्ण झाल्या. मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या नेतृत्वात आणि सततच्या पाठपूराव्यामूळे रुग्णवाहिका चालकांना न्याय मिळाला असून रुग्णवाहिका चालक व त्यांचे कुटुंबीय यांनी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार तथा मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांचे आभार मानले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #maharashtranavnirmansena #rugnavahika #Ambulance #Ambulancedriver #contract #HighPride #Monthlysalary #ContractorNotpayingmonthlysalary #hunger #Thequestionofhowtosupportthefamily #WCL #WCLMahakaliCollieryChandrapur #GeneralManager #statement #KishoreMadgulwar #KuldeepChandankhede
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.