आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १५ ऑगस्ट २०२४) -
राजुरा नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या डॉक्टर झाकीर हुसेन शाळा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या पहिली ते पाचवीतील दीडशे विद्यार्थ्यांना कलर किटचे वाटप रोटरी क्लब राजुराच्या वतीने करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि त्यांना कला शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
येथील चांडक कृषी केंद्राचे संचालक प्रतिष्ठित व्यापारी श्री राजेंद्रजी चांडक यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेच्या डॉक्टर झाकीर हुसेन शाळा आणि नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेच्या पहिली ते पाचवीतील दीडशे विद्यार्थ्यांना कलर किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, माजी अध्यक्ष नवल झंवर, कमल बजाज, सचिव निखिल चांडक, सदस्य डॉ. अमोघ कल्लूरवार, आनंद चांडक, मयूर बोनगीरवार, निखिल शेरकी, डॉक्टर झाकीर हुसेन शाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी आत्राम, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा येरणे, सहशिक्षिका पातुरकर मॅडम, आशा रामटेके, पेंदाम मॅडम, शेंडे मॅडम व दोन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #RajuraMunicipalCouncil #DoctorZakirHussainSchool #NetajiSubhashChandraBoseSchool #1stto5thgradestudents #students #School #RotaryClubRajura #ChandakAgriculturalCentre #Rajendrajichandak #NavalZanwar #KamalBajaj #SarangGirsawale
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.