Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती व सावली तालुक्यातील बेघरांना मिळणार हक्कांच घर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
1136 घरकुलांना मिळणार मंजूरी मंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून होणार 1136 घरकुल मंजूर चंद्रपूर जिल्हा भाजयुमो चे जिल्हाध्...

1136 घरकुलांना मिळणार मंजूरी
मंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून होणार 1136 घरकुल मंजूर
चंद्रपूर जिल्हा भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांच्या सततच्या पाठपुराव्याल यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. 13 जुलै 2024) -
जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थी आपल्याला सरकार कडून घर मिळतील या आशेवर आहेत. बेघर लाभार्थी आपल्याला घर मिळणार, याच अपेक्षेवर कित्येक वर्षापासून जीवन व्यतीत करीत आहेत. अशातचं आता जिवती व सावली तालुक्यातील अनेक गावांमधील बेघर लाभार्थ्यांना लवकरचं हक्काचं घर मिळणार आहे. त्यामूळे बेघर लाभार्थींची प्रतिक्षा लवकरचं संपणार असून, बेघर लाभार्थ्यांना मंत्री, मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिलेला आहे.

         चंद्रपूर जिल्हयातील 1136 घरकुलांना शासनांकडून मंजूरी मिळणार असून, त्यात घरकुलसाठी पात्र असलेल्या जिवती तालुक्याकरीता 476 पात्र लाभार्थींना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून; तर 112 लाभार्थींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (धनगर) घरकुल योजनेतून मंजूर होणार आहेत तसेच सावली तालुक्यातील 548 लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून मंजूरी मिळणार आहे. सावली तालुक्यातील 548 पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळावे यासाठी माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद, चंद्रपूर संतोष तंगडपल्लीवार हे प्रयत्न करीत होते.

           जिवती व सावली तालुक्यातील एकूण 1136 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर व्हावे, यासाठी मंत्री, ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले असून, जिवती तालुक्यातील दोनही योजनेतून 588 घरकुलांना मंजूरी मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी मंञी, मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सतत पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे.

         यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून जिवती तालुक्यातील ग्रा.पं.केकेझरी-1, कुंबेझरी-59, कोदेपूर-18, टाटाकोहाड-2, चोपनगुडा-7, चिखली (खुर्द)-32, चिखली (बु.)-22, दमपूर मोहदा-34, धोंडाअर्जूनी-23, नंदप्पा-11, पाटण-9, पिट्टीगुडा नं.2-50, गुडशेला-55, आसापूर-45, सेवादासनगर-20, मरकलमेटा-14, लांबोरी-12, मरकागोंदी-7, सोरेकसा-30, टेकामांडवा-13, खडकी हिरापूर-12 तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (धनगर) घरकुल योजनेतंर्गत खडकी हिरापूर-14, गुडशेला-47, चिखली (खुर्द)-12, टेकामांडवा-22, धोंडाअर्जूनी-3, नंदप्पा-5, पाटण-1, पुडीयाल मोहदा-3, लांबोरी-2 व मरकागोंदी-3 असे घरकुल मंजूर होणार आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #jiwati #sudhirmungantiwar #maheshdevkate #gharkul #house

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top