Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १५ वर्षीय विद्यार्थिनीवर ५५ वर्षीय नराधमाने केला अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील घटना आमचा विदर्भ - दीपक शर्मा / अविनाश रामटेके, प्रतिनिधी राजुरा / विरूर स्टेशन (दि. १२ जुलै २०२४) -         राजुरा तालुक...

राजुरा तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा / अविनाश रामटेके, प्रतिनिधी
राजुरा / विरूर स्टेशन (दि. १२ जुलै २०२४) -
        राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय नराधम मागील अनेक दिवसापासून अत्याचार करीत असल्याची बाब उघडकीस आली.

        मिळालेल्या माहितीनुसार चिंचोली येथील पुरुषोत्तम चोथले (वय ५५ वर्षे) याने अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार केल्याचे ११ जुलै रोजी उघडकीस आले. पीडित मुलीच्या आईने याबाबत विरूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. १७७/२०२४ भादंवि ३७६(२)(एन) ३७६(३) कलम ४५० पोस्को कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सदर प्रकरणी पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पीडिता तीन महिन्याची गर्भधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

        अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा नराधम हा ५५ वर्षाचा असून त्याच्या गावचा परिसरातील काही मंडळी प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी लावला आहे. आबिद अली यांनी आरोपी विरुद्ध जलदगती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावे व आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #torture #policestationwirur #minorschoolgirl #SexualAssaultCase #crime

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top