Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ना. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२४) -         राज्यभरातील शेतकऱ्यांचा पि...
ना. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ जुलै २०२४) -
        राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिक विम्याच्या संदर्भात आदेश दिले होते. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४’ साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून त्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ही मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविण्याची मागणी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. ‘राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना गेल्या कित्येक वर्षापासून राबवित आहे. यावर्षी देखील शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पण पीक विमा नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढवावी,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #sudhirmungantiwar #Registrationofcropinsurance #StateAgricultureMinister #Cropinsurance #farmer

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top