आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जुलै २०२४) -
विद्यार्थी हिताचा विचार करून सत्र 2023-24 मध्ये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने "कॅरी फॉरवर्ड" या पद्धतीने नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सवलत दिली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ झालेला होता या पार्श्वभूमीवर सत्र 2024-25 मध्ये विद्यार्थी प्रवेशाकरिता कॅरी फॉरवर्ड पद्धती लावावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन केलेली आहे. मागील वर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यावर्षी कमी असल्याने त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने त्यात पुन्हा विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी असल्याने विद्यार्थी संख्या पुन्हा कमी होऊन त्यांचा शैक्षणिक कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम महाविद्यालयात होत आहे.
करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सत्र 2024- 25 करिता "कॅरी फॉरवर्ड" या पद्धतीने नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.विजय वाढई, सहसचिव डॉ.सतीश कन्नाके तसेच संघटनेचे पदाधिकारी डॉ.अक्षय धोटे, डॉ.प्रकाश शेंडे, डॉ.राहुल सावलीकर डॉ.निलेश चिमूरकर डॉ.मिलिंद भगत इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत. या संदर्भात सदर कॅरी फॉरवर्ड पद्धती लावण्या संदर्भात सकारात्मक आश्वासन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #rajura #GondwanaUniversity #Carryforwardplan #GondwanaUniversityYoungTeachersAssociation #students
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.