Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: क्रांतीदिना निमित्य "महाराष्ट्रवादी चले जाव" चा जयघोष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विराआंस समिती फडविणार नागपूर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा - ॲड. वामनराव चटप आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२४) -  ...

विराआंस समिती फडविणार नागपूर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा - ॲड. वामनराव चटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२४) -
     गेल्या ११९ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून आणि बारा वर्षापासून सतत अनेक  जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आता विदर्भ राज्य आंदोलन समिती दिनांक १० ऑगस्ट २०२४ ला (९ ऑगस्टच्या क्रांतीदिनानिमीत्य) नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे. या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता एकत्र येणार असून त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन (संविधान चौक) पर्यंत लाॅगमार्च द्वारे जाऊन विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविणार आहेत.

     केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सह अनेक पक्षांनी विरोधी पक्षात असतांना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात तर सहभाग घेतला, मात्र सत्तेवर येताच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याऐवजी वैदर्भिय जनतेच्या तोंडाला पाने पुसली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आपले वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल जरब बसविली आहे. आता सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणूकीत विदर्भातील जनता याचे चोख उत्तर देणार आहेत.

     या अनुषंगाने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकांवरील अन्याय संपविण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकार ला इशारा देण्यासाठी "महाराष्ट्रवादी चले जाओ" चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुंकणार आहे. कुठल्याही परिस्थितीत १० ऑगस्ट २०२४ ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर येथे "विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झंडा फडकविणारचं" असा निर्धार व्यक्त केला आहे.

     २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचे लिखित आश्वासन देऊनही आजपर्यंत विदर्भाचे राज्य निर्माण केले नाही, म्हणून बीजेपी ला विदर्भातून हद्दपार व्हावे लागले. तसेच विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे खाते सुद्धा उघडू शकले नाही. नव्या सरकारने जर विदर्भाचे राज्य त्वरित निर्माण केले नाही तर विदर्भाची जनता भाजपला विदर्भात चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. "अबकी बार विदर्भ की सरकार" चा नारा देत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे.

     या आंदोलना दरम्यान केंद्र सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करण्यात यावी,  अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस इतर वन्यजीवा प्रमाणेच मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिक विमाधारक शेतकऱ्यांना तात्काळ पिकविम्याची मदत देण्यात यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेही लावू नये या ज्वलंत मागण्या करण्यात येणार आहेत. आष्टी ते सुरजागड कांक्रीट रस्ता बांधकाम ला राज्य सरकारने त्वरित मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करण्यात यावी, बल्लारशहा - सुरजागड रेल्वे मार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी समितीने केली आहे. या आंदोलनात संपूर्ण विदर्भातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, अरुण केदार, मुकेश मासुरकर, किशोर दहेकर, कपिल ईद्दे, प्रशांत नखाते, अंकुश वाघमारे, मारोतराव बोथले, रमेश वरुडकर, नीळकंठ कोरांगे, सुनिल बावणे, प्रभाकर ढवस, मधुकर चिंचोलकर, बळीराम खुजे यांनी केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #rajura #krantidin #vidarbharajyaaandolansamiti #maharashtrawadichalejao #vidhanbhavan #nagpur #IndependentStateofVidarbha #vidarbharajya #YashwantStadium #sanvidhanchauk #advwamanraochatap #wamanraochatap #Vaidrabhiyajanta #AssemblyElections #abakibarvidarbhakisarkar #BallarashahSurjagadrailwayroute #AshtitoSurjagadconcreteroad #Smartprepaidmeter

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top