राजुरा (दि. २९ जुलै २०२४) -
झाडे पृथ्वीवरील आपले सर्वोत्तम मित्र आहेत. आपण झाडांशिवाय जगू शकत नाही. आपण झाडांना थोडी जागा आणि थोडे पाणी देतो आणि ते आपल्याला फक्त जीवनापेक्षा बरेच काही देतात. झाडाने दिलेल्या सावलीत बसून माणसाला आनंद वाटतो. जेसीआय राजूरा रॉयल्सच्या या सामाजिक संस्थेने 100 सीड्स बॉल्स तयार करून शहराच्या ठिकठिकाणी सीड्स बॉल चा प्रकल्प घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानात 25 झाडे लावण्यात आली व त्या झंडाच्या संगोपनाची जबाबदारी जेसी सदस्यांना सोपविण्यात आली.
जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा यांनी वृक्षारोपण करत असताना झाडे वीज वाहिनी तारेच्या खाली येऊ नये व झाडे मोठी झाल्यावर विनाकारण महावितरण कर्मचाऱ्यांना झाडावर चढून झाडे छाटू लागू नये असे आवाहन करत त्याच अनुषंगाने वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण अभियानात राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरुपा झंवर, सचिव मोनिशा पाटणकर, जयश्री शेंडे, सुषमा शुक्ला, मधुस्मिता पाढी, सुशीला पोरेड्डीवार, स्मृति व्यवहारे, राधा धनपावडे, प्रफुल्ला धोपटे, श्वेता जयस्वाल, ज्योती मेडपल्लीवार, सिमिती चौहान, आशा चंदेल, राधा वीरमलवार, नम्रता खोंड, अनुष्का रैच, नम्रता खंनगन, श्वेता अपराजित, कृतिका सोनटक्के तसेच वनविभाग अधिकारी मनोज देशकर यांनी विशेष सहकार्य केले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #rajura #Plantation #vruksharopan #Seedsballs #jcirajuraroyals #jci #jciindia #swarupajhanwar
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #rajura #Plantation #vruksharopan #Seedsballs #jcirajuraroyals #jci #jciindia #swarupajhanwar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.