Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर नगर परिषद पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शरद जोगी व विक्रम येरणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २० जुलै २०२४) - ...

शरद जोगी व विक्रम येरणे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २० जुलै २०२४) -
        गडचांदूर नगर परिषद पथविक्रेता समिती सदस्य पदाची निवडणुकी नुकतीच पार पडली. गडचांदूर शहरातील हातगाडी, फेरी, पथारी, स्टॉलधारक यांची पथ विक्रेता समिती सदस्य पदांची निवडणूक प्रक्रिया मुख्याधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रसंगी अशोक बोधे, अमजद खान, प्रीतम सातपुते, समाधान सोनकांबळे, गणेश आदे, वंदना रतनकर, अल्का मेश्राम हे विजयी झाले. 

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी व नगर सेवक विक्रम येरणे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा हार, पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. 

        पथ विक्रेता अधिनियम २०१४ व भविष्यात पथ विक्रेता उपजिविका संरक्षण संवर्धन आणि रक्षण योजना तयार करणे. पथ विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करणे. पथ विक्रेता झोन निश्चित करणे, समितीचे कामकाज कसे चालते इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी सांगितले. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #gadchandur #CityCouncilRoadVendorCommittee

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top