राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ जुलै २०२४) -
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात शेतीविषयक तज्ञ मंडळी आणि सहकारी नेते यांचा शेतकऱ्यांशी संवाद साधणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे. ही यात्रा आपल्या जिवती, कोरपना, राजुरा, आणि गोंडपिपरी तालुक्यातून दिनांक १७, १८, १९ जुलै रोजी मार्गक्रमण करेल.
यात्रेचा मुख्य उद्देश:
- - शेतकऱ्यांच्या समस्यांवर तज्ञ मार्गदर्शन
- - आधुनिक तंत्रज्ञान व शेतीचे नवे उपाय
- - शेतमालाचे व्यवस्थापन व बाजारपेठेचे ज्ञान
- - सरकारी योजनांची माहिती व त्याचा लाभ सांगणे
- - अर्थसंकल्प २०२४ मधील कृषीहिताच्या योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवणे
- - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जनजागृती करणे
या यात्रेत शेतीविषयक तज्ञ, सहकारी नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील व त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवतील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाचे व्यवस्थापन, बाजारपेठेचे ज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती मिळवून देण्याचा या यात्रेचा उद्देश आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि बळीराजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र यावे, सर्व शेतकरी बांधवांना या यात्रेत सहभागी होऊन आपली समस्या आणि अपेक्षा मांडण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.