Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शालेय विद्यार्थ्यांसाठी सिकलसेल तपासणी शिबीराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपजिल्हा रुग्णालय राजुरा व राजुरा तालुका पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 14 जुलै 2024) -         दिनां...

उपजिल्हा रुग्णालय राजुरा व राजुरा तालुका पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 14 जुलै 2024) -
        दिनांक १५ जुलै २०२४ सोमवारला सकाळी ११.३० वाजता, राजुरा तालुका पत्रकार संघात राजुरा शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सिकलसेल तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रमुख अतिथी माजी अँड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपा चंद्रपूर लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, भाजपा राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, कृ. उ. बा. स. संचालक अँड. अरुण धोटे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे, माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदिप जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

        यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास राजुरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजुरा तालुका पत्रकार संघा तर्फे करण्यात आले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #rajuratalukapatrakarsangh #Sicklecellscreeningcamp #ruralhospitalrajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top