Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आसोलामेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निर्देश आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि.१५ जुलै २०२४) -         यंदा...

ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निर्देश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि.१५ जुलै २०२४) -
        यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आल्यामुळे शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे काही गावांना आसोलामेंढा तलावातील पाणी कॅनॉलद्वारे तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. 

        मूल व पोंभूर्णा तालुक्यात गावांमधील शेतीला आसोलामेंढा प्रकल्पाच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. या ठिकाणी भाताची शेती मोठ्या प्रमाणात होते. दुर्दैवाने, खरीप हंगाम २०२४ मध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे राजगड, भवराळा पासून घाटकुळ आणि दिघोरी पर्यंत गावांमध्ये शेतीला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही. अश्यात शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

        आसोलामेंढा तलावातील पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याची कार्यवाही तातडीने करावी, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी व आसोलामेंढा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना यामध्ये स्वतः लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचेही निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #sudhirmungantiwar #AsolamendhaLake #Mooltaluka #Pombhurnataluka #Collector #ExecutiveEngineersofAsolamendhaProject #Providewaterforagriculturetothefarmers

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top