Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा पथविक्रेता समितीची बिनविरोध निवडणूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पथविक्रेता समितीत 8 सदस्यांची निवड आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि.28 जून 2024) -                 सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर फेरीवा...

पथविक्रेता समितीत 8 सदस्यांची निवड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.28 जून 2024) -
                सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर फेरीवाल्यांचीही लवकर निवडणूक घेऊन नगरपालिका क्षेत्रात 8 सदस्यांची नगर पथविक्रेता समितीवर निवड करण्याबाबत आदेश शासनाकडून आदेश प्राप्त होताच नगर परिषद राजुरा येथे नगर पत विक्रेता निवडणूक 2024 सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीत एकूण 18 पत विक्रेतानी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यापैकी 10 पथ विक्रेतानी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने या निवडणुकीत 8 सदस्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. 
  • राकेश सुरेश बेतावार (सर्वसाधारण खुला प्रवर्ग )
  • विनोद लहुजी साळवे (सर्वसाधारण खुला प्रवर्ग )
  • मनीषा संतोष रामगिरवार (सर्वसाधारण महिला राखीव)
  • तजिन कैकशा शेख इर्शाद (अल्पसंख्यांक महिला राखीव)
  • शेख इर्शाद शेख रहीम (विकलांग )
  • सरिता मुरलीधर वरवाडे (इतर मागास प्रवर्ग महिला राखीव)
  • मीना सिद्धार्थ देठे (अनुसूचित जाती)
  • गुणवान आत्माराम मडावी (अनुसूचित जमाती )
        हे यश मिळवण्यासाठी विविध उमेदवारांनी प्रयत्न केले आणि सर्वांना समर्थन मिळाले. समितीवर नवनिर्वाचित सदस्यांनी आपले कार्य तत्परतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचे वचन दिले आहे.

पथविक्रेता समितीचे कार्य व अधिकार 
        शहरातील फेरीवाल्यांचे झोन निश्चित होतील. अवैध व बेकायदेशीर व्यवसायाला आळा बसेल. गर्दी तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल. शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्यात भर पडेल. फेरीवाले अधिकृत होतील, त्यांना जबाबदारीने त्यांची कर्तव्ये पार पाडणे, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, त्यानुसार जागा निश्चित करणे, पदपथावर विक्रीसाठी प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्र रद्द करणे, फेरीवाला झोन अथवा फेरीवालामुक्त झोन क्षेत्राची शिफारस करणे, विक्रीसाठी ठिकाणे, जागा निश्चित करणे, सार्वजनिक जागेत गर्दी होणार नाही, यासाठी विक्री वेळा निश्चित करणे, पतपुरवठा, विमा, सामाजिक सुरक्षेच्या इतर कल्याणकारी योजना तयार करणे आदींसह 18 प्रकारचे कामकाज या समितीद्वारे केले जाणार आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #StreetVendorCommittee #NationalHawkerPolicy #Uncontestedchoice #nagarparishadrajura #rakeshbetawar #vinodsalve #ElectionAdjudicatingOfficer #mukhyadhikari

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top