Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रविवारी गडचांदूरात मोफत भव्य महाआरोग्य शिबीर!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे देवराव भोंगळे यांचे आवाहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे आयोजन आमचा...

नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे देवराव भोंगळे यांचे आवाहन
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे आयोजन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि.२८ जून २०२४) -
        शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून येत्या रविवारी (दि. ३० जून रोजी) स्थानिक स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्कपणे करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

        सदर शिबीर सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार असून याठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिबीरात येणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड व केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे. असे आवाहन आयोजक तथा भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #bjp #RajuraAssemblyElectionChief #DevraoBhongle #powercut #sudhirbhaumungantiwarsevakendra #helthcamp #mofatmahaaarogyashibir #gadchandur #latebhauraopatilchatapashramschool #Diagnosisofalltypesofdiseases #Cataractsurgery

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top