आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २८ जून २०२४) -
मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्राचे चनाखा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 160 मधून जाणाऱ्या दक्षिण मध्ये रेल्वे लाईन वर रेल्वेच्या धडकेत अंदाजे तीन वर्षीय बिबट ठार झाल्याची घटना 27 जून रोजी दुपारच्या वेळेस घडली.
राजुरा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक 160 मधून मध्य व दक्षिण रेल्वेचे ट्रॅक आहे. गुरुवार २७ जूनच्या दुपारच्या सुमारास याच ट्रॅकवरून रस्ता ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने बिबट्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वेल्केडवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी अधिनस्थ वन कर्मचाऱ्यांना घेऊन पोहोचले मोका पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सूचनेनुसार उत्तरीय कारवाई सुरू आहे. पुढील कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोग यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वेलकेटवार आणि वन कर्मचारी करीत आहे.
#aamchavidarbha #Vidarbha #news #BreakingNews #chandrapur #rajura #MadhyaChandaForestDivision #Railway #Leopard #dakshin #SouthCentralRailway #vihirgao #chanakha #RajuraForestRange #ConservatorofForests #SubDivisionalForestOfficer #ForestRangeOfficer #killed
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.