21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार
राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.28 जून 2024) -
देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारताच्या संकल्पनेतुन महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तिचा अर्थसंकल्प आज महायुती सरकारने विधान मंडळात सादर केला. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय, शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा असणारा आहे. आपल्या शेतकरी बांधवासोबतच समाजातील सर्व घटक – महिला, युवती, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार व उद्योजक या सर्वांना चालना देणारा स्वप्नपूर्तीचा अर्थसंकल्प आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत महाराष्ट्राचतील अडिच कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणारी योजना व माता भगिनी यांना वर्षात ३ सिलेंडर योजना या महत्वपूर्ण घोषणा आहेत. महत्वपूर्ण घोषणेसह सर्व निर्णयासाठी मी महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन करतो. असे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #Budget #mukhyamantrimajhiladakibahinyojana #1500permonthtowomeneach #Threegascylindersfree #drmangeshgulwade #mangeshgulwade
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.