आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि.29 जून 2024) -
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरिता 11 मार्च 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाकरिता SEBC जीआर काढून संपूर्ण महाराष्ट्रात एसीबीसी अंतर्गत आरक्षण लागू केले, त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला जातीचे दाखले व नॉन क्रिमिलेयर देण्यात येत आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मराठा समाजाला जातीचे दाखले देण्यात येत नाही आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी टोकर असलेला जिवती तालुका येथे मराठा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे मात्र त्यांना आतापर्यंत जातीचे दाखले मिळाले नाहीत. राजुरा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी वेळोवेळी दाखले देण्याकरता टाळाटाळ करत आहे. SEBC आरक्षण बाबत मला कोणताही जीआर व माहिती आलेली नाही व पहिले काही दाखले दिलेले आहेत ते रद्द करेल यापुढे मी दाखले देणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाला जातीचे दाखले मिळत नाहीत आणि मराठा समाजाच्या मनात जतीच दाखले मिळतील की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले लागतात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसीबीसी अंतर्गत काही पदाकरिता जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्याकरिता जातीच्या दाखल्याचे अत्यंत आवश्यक आहे. जातीचा दाखला नसल्यामुळे समाजाचा उमेदवार त्या पदाकरिता वंचित राहू नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मराठा समाजांना लवकरात लवकर जातीचे दाखल देण्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना SEBC अंतर्गत मराठा समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांनी केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #Marathasamaj #rajura #jiwati #casteCertificates #Noncremelayercertificate #shivsena #marathasamajreservation #Collector #SubDivisionalOfficerRajura #PoliceRecruitmentinMaharashtra #BharatBiradar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.