आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.29 जून 2024) -
गरजूंना सहकार्य करण्याच्या भावनेतून कोरोना काळात "हेल्पिंग हँड" संस्थेची स्थापना करण्यात आली. "हेल्पिंग हँड" द्वारे वेळोवेळी गरजूना मदत कार्य करण्यात येत असून नुकतेच रंजना निमगडे व प्रिया रामटेके ह्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ह्या दिव्यांग असूनही स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या कुठल्याही प्रकारची कोणाकडे याचना न करणाऱ्या दोघींच्या कामाचे गौरव करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमृता धोटे यांनी आपणही समाजाचा घटक आहे, प्रत्येकाने समाजाप्रती प्रत्येकाने आपले दायित्व स्वीकारायला पाहिजे व मदत करायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
हेल्पिंग हँड च्या सौ.कृतिका सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या सहकार्यातून नगरपरिषद च्या बाजूला असणाऱ्या संकटमोचन हनुमान मंदिरात हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश शेंडे यांनी 'हि संस्था नेहमीच गरजूंना सहकार्य करत असते असे विचार व्यक्त केले. यावेळी रंजना निमगडे, प्रिया रामटेके, सतीश शेंडे, संतोष झंवर, स्वरूपा झंवर, भावना रागीट, अमृता धोटे, नीता आकनुरवार, कृतिका सोनटक्के, रजनी शर्मा, स्नेहा चांडक इत्यादी चे सहकार्य लाभले. संचालन स्वरूपा झंवर, आभार भावना रागीट यांनी केले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #helpinghand #bamani #JhunkaBhakarCenter #sankatmochanhanumanmandir
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.