आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि.29 जून 2024) -
प्रियदर्शनी विद्यालय रामपुरच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा (दि. २९) आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश मिळण्यासाठी परिश्रम करावे लागते. वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. आलेल्या परिस्थितीवर मात करून समोरील ध्येयाकडे वाटचाल करावी लागते, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रमुख पाहुणे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, संस्थेचे उपाध्यक्ष बाबाराव वाभिटकर, रामपूर गरम पंचायतीच्या सरपंच निकिताताई झाडे, आर्वीचे सरपंच सूरज उर्फ भत्ता माथणकर, माजी सरपंच वंदनाताई गौरकार, माजी सदस्य अजय सकिनाला, प्राचार्य मनोज पावडे, प्रियदर्शनी विद्यालय तथा कनिष्ठ महविद्यालय शेणगावचे प्राचार्य नितीन कडवे, साखरी येथिल मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित केशवराव ठाकरे यांनी, आपल्या आयुष्यातील उद्देश निश्चिती करून आत्मविश्वासाने पाऊल पुढे करत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यालयातून प्रावीण्य प्राप्त प्रतीक्षा उरकुडे, श्रुती विरुटकर, अनुराधा डाखरे, लक्ष्मी लांडे यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मनोज पावडे यांनी केले. संचालन राजेश वाघाये यांनी, तर आभार नितीन ठाकरे यांनी मानले. आयोजनासाठी शिक्षक महेंद्र मंदे, ममता नंदुरकर, श्रीकृष्ण गोरे, इंद्राराज वाघमारे, रमाकांत निमकर, अभय बोभाटे, निलोफर खान, मंगला हटवार, योगिता झाडे, सतिष पेटकर यांनी सहकार्य केले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #Meritoriousstudentsfelicitated #welcomeceremony #srudents #PriyadarshiniVidyalayaRampur #Studentsandparents #hardwork #Management #SudarshanNimkar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.