Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती-बल्लारपूर वर्धा नदी पुलावर अपघातात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोली कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि.०२ जुलै २०२४) -         वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी डीप कोळस...

वेकोली कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.०२ जुलै २०२४) -
        वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी डीप कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या सास्ती येथील तरुणाचा सास्ती-बल्लारपूर मार्गवरील वर्धा नदीच्या पुलावर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

        मृतक तरुणाचे नाव सचिन अशोकराव पत्तीवार (वय अंदाजे ४५) असून तो काही दिवसापूर्वीपासून चंद्रपूर येथे राहात होता आणि तिथून ड्युटी करिता जाणे येणे करत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी ड्युटीला येताना समोर गाडी असल्याचे पाहून पुलावरील खड्डा चुकविताना तोल गेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला व अखेर घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. सचिन आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्याचे मागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा आहे.

        घटनेची माहिती मिळताच सास्ती-बल्लारपूर वासियांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सचिन हा स्वभावाने अतिशय मनमिळाऊ असल्याने गावात व त्याचे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अचानक जाण्याने आप्तेष्ट अत्यंत भावुक झाले होते. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #accident #wardhariver #wardhanadi #sasti #wclballarpurarea #GowriDeepCoalMine #wclemployee #death


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top