आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 15 जून 2024) -
शालेय स्तरावरील परीक्षेत विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याकरीता शाळेच्या शिक्षकांसोबतच त्यांच्या पालकांचेही मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थी शाळेपेक्षा अधिक काळ हा पालकांसोबत राहत असल्याने त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देणे पालकांचे कर्तव्य असल्याचे मत राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी साखरी येथील प्रियदर्शिनी विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा द्वारा संचालित प्रियदर्शिनी विद्यालय साखरी व संघर्ष युवा विकास मंडळ साखरी यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज (दि.१४) करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या शिक्षण प्रसारक मंडळ चुनाळा चे अध्यक्ष तथा राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर, उद्घाटक म्हणून वेकोलीच्या पोवनी सब एरीया चे प्रबंधक बि.आर. सोळंकी, तर प्रमुख अतिथी म्हणून संघर्ष युवा विकास मंडळ साखरी चे सचिव तथा भाजपाचे तालुका महामंत्री अँड. इंजि. प्रशांत घरोटे, बाबाराव वाभिटकर, काशिनाथ गोरे, माजी पोलीस पाटील मोतीराम गोरे, रामचंद्र लांडे, शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, सुरेश कौरासे, संतोष उरकुडे, तुळशिराम चिकनकर, अरूण मिलमिले उपस्थित होते.
प्रियदर्शिनी विद्यालय मागील चार वर्षापासून १०० टक्के निकाल देणारी शाळा ठरली असून दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या इशांत निवलकर, द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी श्रेया कुचनकर (८९.६०) तर तृतीय क्रमांक प्राप्त करणारी आरती पहानपटे (८८.२०) सह प्राविण्यप्राप्त विद्यार्थी खुशी कुचनकर, पुर्वा काकडे, सानिका खुजे, आदित्य निवलकर, साहिली कौरासे, संस्कार वडस्कर, चेतना ईटनकर, नंदिनी मिलमिले, गायत्री निमकर, डिंपल उरकुडे, क्रिष्णा पिंपळकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघर्ष युवा विकास मंडळातर्फे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा तर प्रियदर्शिनी विद्यालयाच्या वतीने पोवनी सब एरीया चे प्रबंधक बि.आर. सोळंकी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय आवारात फळझाडांची लागवड करण्यात आली.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे यांनी केले. संचालन शाळेचे शिक्षक विठोबा हिंगाणे यांनी तर उपस्थितांचे आभार पुरुषोत्तम मुन यांनी मानले. याप्रसंगी शाळेचे नितिन मुसळे, आनंदराव गोरे, सुंदरलाल कावळे, आनंद किन्नाके, सुधाकर गादंगीवार संघर्ष युवा विकास मंडळाचे सुदर्शन बोबडे, अनिल गोरे, अमोल डेरकर, रामकिसन ताजणे, राकेश उरकुडे, गजानन चोथले, प्रज्वल चोथले, सह पदाधिकारी उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #exmla #sudarshannimkar #PriyadarshiniVidyalaya #VidyaShikshanPrasarakMandalChunala #sangharshyuvavikasmandal #PouaniSubArea #wcl #ballarpurarea #AdvEngrPrashantGharote
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.