Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रशासकीय सेवा परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा ॲड.वामनराव चटप यांचे हस्ते सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 17 जून 2024) -         नगर परिषदेच्या कर व प्रशासकिय सेवेत निवड झाल्याबद्दल गडचांदूर येथील सुशीला निळक...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 17 जून 2024) -
        नगर परिषदेच्या कर व प्रशासकिय सेवेत निवड झाल्याबद्दल गडचांदूर येथील सुशीला निळकंठ पावडे (क गट) व पालगाव येथील संकेत बाबाभीम उमरे (ब गट) यांचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शासकिय नौकरीत सहभाग वाढत असल्याबद्दल ॲड. वामनराव चटप यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

        यावेळी माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, प्राचार्य धनराज काळे, ॲड. श्रीनिवास मुसळे, संतोष पटकोटवार, हबीब शेख, किशोर विधाते, वासुदेव गौरकार, ॲड.दीपक चटप, पुष्पा पावडे, महानंदा उमरे, मधुकर चिंचोलकर, नरेंद्र मोहारे, चेतन खोके, आदींची उपस्थिती होती.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #exmla #wamanraochatap #nagarparishad #AdministrativeServices

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top