Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोली द्वारे सास्ती येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 17 जून 2024) -        वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयाद्वारे सास्ती येथील ग्रामपंचायत भवन येथे...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 17 जून 2024) -
       वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयाद्वारे सास्ती येथील ग्रामपंचायत भवन येथे कंपनीच्या सामुदायिक सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा जवळपास २०० रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराचे उ‌द्घाटन सास्तीच्या सरपंच सुचिता अश्विन मावलीकर व उपसरपंच सचिन कुडे यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य राजकुमार भोगा, दीपिका जुलमे, पुरुषोत्तम नळे, मधुकर झाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       वेकोलीच्या कोळसा खाण परिसरात होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध रोगांनी ग्रासले जाते. त्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार करणे गरजेचे होते. वेकोलीच्या सामाजिक दायित्व अंतर्गत क्षेत्रीय रुग्णालयातर्फे सास्ती येथे शनिवारी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रुग्णांची बॉडी चेकअप, बोन डेन्सिटी चेकअप करण्यात आले. जवळपास २०० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराकरिता क्षेत्रीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.ओबेश अली यांचे नेतृत्वात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अनप्पा जया, डाॅ.एच.अमरनाथ रेड्डी, फार्माशीष्ट मृणाल मुजुमदार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जस्टी चाफले यांनी तपासणी व उपचार केले. हर्षाली घाटे, ज्योती तुराणकर, सरीता उरकुडे, अंजू डेरकर, शारदा डाखरे, प्रिया कातकर, अजय व प्रदीप यांनी सहकार्य केले. शिबीरात रूग्णांना मोफत औषधी वितरण करण्यात आले. यावेळी अशी आरोग्य शिबीरे नेहमी आयोजित करावी, असे मत रूग्णांनी व्यक्त केले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #wcl #ballarpurarea #Healthcheckupcamp #CommunitySocialActivities #RegionalHospitals #SastiGramPanchayat

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top