Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोंडपिपरीतील महाआरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१४२७ रुग्णांनी केली विविध आजारांची तपासणी, तर ५१५ रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र आमचा विदर्भ - दीपक शर्मा  गोंडपिपरी (दि. 17 जून 2024) -        म...

१४२७ रुग्णांनी केली विविध आजारांची तपासणी, तर ५१५ रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
गोंडपिपरी (दि. 17 जून 2024) -
       मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गोंडपिपरी तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १६) शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते दिपक बोनगीरवार, बळवंत पिपरे आणि पांडुरंग कष्टी यांच्या हस्ते संपन्न झाले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबीराचा गोंडपिपरी तालुका परीसरातील १४२७ नागरीकांनी लाभ घेतला. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबीरात मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग आणि त्वचारोग यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या १४२७ रुग्णांपैकी ५१५ रूग्ण हे शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर उद्यापासून टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

        या शिबिरामध्ये बोलताना, आयोजक तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला सेवेचा मंत्र दिला आहे. खरंतर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावाचं समानार्थी शब्दच सेवा होतो आणि त्यांच्या सेवेचा वसा पुढे नेत मागील अनेक वर्षांपासून आम्ही अशा पद्धतीने महाआरोग्य शिबीरांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजन करतो. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शिकवण आहे की, 'विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झालं तर लाजायचं नाही.' त्यामुळे गोरगरीबांच्या हाकेला ओ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. या मानवतावादी विचाराने आम्ही सेवेचा यज्ञ चालू केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी अतीगंभीर आजार अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी गोंडपिपरी तालुक्यातील गोरगरिब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशाप्रकारच्या महाआरोग्य शिबीराचे आज आयोजन करण्याचे आले. या शिबिराचा गोंडपिपरी परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले याचे मला आत्मीय समाधान वाटते. 

        पुढे बोलताना, पुढच्या टप्प्यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर, जिवती व राजुरा याठिकाणी सुद्धा अशाप्रकारच्या भव्य महाआरोग्य शिबीरांचे लवकरच आयोजन होणार असून नागरिकांनी त्या ठिकाणीही अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करत शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार ही त्यांनी यावेळी मानले. 

        या शिबिरात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, माजी पं. स. सभापती दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलवार, नगरसेवक राकेश पुण, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, संजय उपगण्लावार, सुरेश धोटे, अनंता येरणे, कृ.उ.बा.स.चे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार,  संजय झाडे, निलेश पुलगमकर, साईनाथ मास्टे, गणपती चौधरी, बंडू बोनगीरवार, अरुण कोडापे, मनिष वासमवार, प्रकाश रापलवार, रमेश दिंगलवार, सतिश वासमवार, मनोज वनकर, बंडू गौरकार, गणेश मेरुगवार, शिथील लोणारे, राहुल चौधरी, गणेश डहाळे, सुरेखा श्रीकोंडावार, अरुणा जांभूळकर, कोमल फरकाडे, मायाबाई वाघाडे, नगरसेविका मनिषा मडावी, मनीषा दुर्योधन, अश्विनी कोडापे, शारदा गरपल्लीवार, संदिप पौरकर, पंकज चिलनकर, वैभव बोनगिरवार, प्रज्वल बोबाटे, अण्णा उलेंदला, सत्यवान भोयर, बळवंत पिपरे, मनोज खेकारे, बळवंत चिलनकर, अंकुश उईके, नितीन तुंमडे, कार्तिक पेंदोर, अमित भोयर, साहिल बट्टे, कार्तिक बट्टे, जय खरबनकर, अंकुश भोयर, रितीक चिलनकर, संतोष मुगलवार, अमीर खान पठाण यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #gondpipari #MahaArogyaShibir #sudhirmungantiwar #deoravbhongale

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top