आमचा विदर्भ - अनंता गोखरे
गडचिरोली (दि. 15 जून 2024) -
गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुणबी हे धनगर पोट जातीतील झाडे या नाम सदृश्य जातीच्या फायदा घेत बोगस जात प्रमाणपत्र घेत नोकरी बडकावत आहेत. याबाबत धनगर संघटनांनी अनेकदा आक्षेप घेत आंदोलने केली आहेत, याबाबत प्रशासनाने दखल घेत अनेक प्रकरणे जात पडताळणी अवैध ठरवलेली आहे.
सन 1922 मध्ये पोलीस विभागात शिपाई पदावर निवड झालेल्या श्रीकृष्ण डुबलवार याचे गडचिरोली जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी निलंबित केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात झाडे कुणबी या जातीचे लोक धनगर झाडे या नाम सादृश्याचा फायदा घेत भटक्या जमाती मध्ये घुसकोरी करून नोकरी बळकावीत आहेत. याबाबत धनगर संघटनांनी वेळोवेळी अनेक आंदोलने करीत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले, धनगर समाजाच्या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेत अनेक प्रकरणे जात पडताळणीत अवैध ठरवलेली आहेत. त्यातील श्रीकृष्ण डुबलवार यास मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) 1956 मधील नि.क्र. 3 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील नि.क्र. 25 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापर करून निलंबित केले आहे.
राज्य राखीव पोलीस काटोल भरतीतील व गडचिरोली पोलीस भरतीतील नोकरीवर लागलेल्याचेही जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची खात्रीलायक माहितीही सामोरे आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यामुळे धनगर समाजात घुसखोरी करणाऱ्या बोगस झाडे यांच्या पायाखालची वाढू सरकली आहे, यामुळे धनगर झाडे जातीत घुसखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #gadchiroli #dhangarsamaj #zade #kunabi #Boguscastecertificate #nomadictribes #movement #MaharashtraPoliceAct #dhangar
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.