उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर स्थगिती
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 15 जून 2024) -
राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गौरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवूनच राज्य सरकारने प्रत्येक निर्णय घेतला आहे आणि प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भातही त्याच दृष्टीकोनातून स्मार्ट निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे, असेही ते म्हणाले.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले आहेत. घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत ना. मुनगंटीवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात चर्चा केली होती. या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानंतर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना ना. मुनगंटीवार म्हणाले, वीज वितरणाच्या दरम्यान संभावित तोटा (डिस्ट्रिब्युशन लॉस) कमी व्हावा किंवा रोखता यावा या उद्देशाने तसेच वीज वितरण कंपन्यांचे गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढावे, मानवी चुका कमी व्हाव्यात, जलद ग्राहक सेवा मिळावी तसेच उत्तम सुविधा ग्राहकांना मिळाव्यात या उद्देशाने स्मार्ट मीटरची योजना जुलै २०२० मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आली होती. परंतु, स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भात घरगुती ग्राहकांमध्ये असलेला रोष व अस्वस्थता बघून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचे केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्र शासनासह ना. सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #Prepaidelectricitymeter #UnionMinistryofPower #Powerdistribution #ChiefMinister #DeputyChiefMinister #MinisterofCulturalAffairs #MinisterofFisheries #SudhirMungantiwar #DevendraFadnavis
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.