Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महेश नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 15 जून 2024) -         माहेश्वरी समाज राजुरा व रोटरी क्लब राजुरा यांच्या संयुक्त विद्यमान महेश नवमी निम...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 15 जून 2024) -
        माहेश्वरी समाज राजुरा व रोटरी क्लब राजुरा यांच्या संयुक्त विद्यमान महेश नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राम मंदिर राजुरा येथे करण्यात आले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून या कालावधीमध्ये अनेक नागरिक रक्तदान करीत नाही. त्यामुळे सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असतो. हा तूटवडा भरून काढण्याच्या करण्याच्या उद्देशाने व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        शिबिरात 36 रक्तदात्यांनी आपले योगदान दिले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता माहेश्वरी समाज व रोटरी क्लब राजूराचे सदस्य ओमप्रकाश बजाज, राजेंद्रप्रसाद झंवर, राजेंद्र चांडक, कमल बजाज, नवल झंवर, आनंद चांडक, सारंग गिरसावळे, संदीप जैन, गजेंद्र झंवर, सुरेश सारडा, प्रशांत गोठी, राहूल अवधूत, किशोर हिंगाने, अमोल कोंडावार, निखिल चांडक, ॠषभ गोठी, गणपतलाल मनियार, कैलाश सारडा, निखिल शेरकी, अर्पणा बजाज, स्नेहल झंवर, राजेश बजाज, विष्णू नावंदर, मनमोहन सारडा, गोविंद सारडा, सुभाष सारडा यांनी मोलाचे सहकार्य केले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #maheshnavami #Blooddonationcamp #RotaryClub #eammandir #GeneralHospital #Maheshwarisamaj

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top