Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धान व मका खरेदी नोंदणी करीता 20 जूनपर्यंत मुदतवाढ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 13 जून २०२४) -         पणन हंगाम 2023-24 रब्बी मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 13 जून २०२४) -
        पणन हंगाम 2023-24 रब्बी मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी / भरडधान्य (मका) खरेदी केंद्रावर शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांची  नोंदणी सुरु झालेली होती. पंरतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असल्याने 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

        तरी शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्याचा 7/12  आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून  दिलेल्या कालावधीत म्हणजे  20 जून 2024 पर्यंत आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर मुदतीत धान खरेदी/ भरडधान्य (मका) खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #farmer #Paddyandmaizepurchaseregistration

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top