Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "मरावे परी दृष्टी रुपी उरावे " जागतिक नेत्रदान दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा : डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रदान पर संवादाचा कार्यक्रम संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 13 जून 2024) -         जागतिक नेत...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रदान पर संवादाचा कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 13 जून 2024) -
        जागतिक नेत्रदान दिवसाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आय डोनेशन मल्टी पर्पज सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या व्यक्तींचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.

        त्यानिमित्ताने मा.ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरातील नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या सुनिता वैद्य, कृष्णा गाईन, शंभू विश्वकर्मा, एड.जनार्दन सुकळी, डॉ.अनुप हस्तक, डॉ.राधिका हस्तक, डॉ. एम.डी. पाल, डॉ. अविनाश दाते, योगेंद्र इंदुरकर, रुपेश डोरले, महिंद्र बाणिक, पी.साबळे, मंदीप बीरेवाल, प्रतीक्षा बिरेवार व कल्पना रावल यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

        याप्रसंगी बोलताना डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले की, "मरावे परी दृष्टी रुपी उरावे " या उक्तीप्रमाणे मरनोप्रांत देखील आपण जिवंत राहू शकतो व सर्व सृष्टी पाहू शकतो आणि अवयव दानात श्रेष्ठदान असणाऱ्या नेत्रदानाचा सर्वांगीण संकल्प करावा असे आवाहन केले.

        याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या नेत्रदानावर आयोजित केलेल्या जनजागृती पर कार्यक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले आणि उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी नेत्रदानाचे आरोग्य दूत म्हणून समाजामध्ये नेत्रदानाचा प्रचार व प्रसार करावा असे सूचक वक्तव्य केले.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.राजेश सुरपाम यांनी आय डोनेशन मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेची प्रशंक्षा केली, तसेच उपस्थित असणाऱ्या तृतीय वर्षीय एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना नेत्रदान संबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. सपन दास (अध्यक्ष आय डोनेशन मल्टीपर्पज सोसायटी) यांनी केले.

        कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रीती उराडे तर डॉ. सपण दास यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारितोषिक मिस्त्री, मि.पंकज, योगेंद्र दांडेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #EyeDonationMultipurposeSociety #sudhirmungantiwar #drmangeshgulwade #mangeshgulwade #GovernmentMedicalCollege #WorldEyeDonationDay 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top