नवीन ठाणेदार म्हणून अजिंक्य तामडे यांची कोरपना येथे नियुक्ती
नवीन ठाणेदारांसमोर अवैध रेती तस्कराचे आवाहन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १२ जून २०२४) -
पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे यांची कारकीर्द मोठी वादग्रस्त ठरली. ज्येष्ठ नागरिक, पत्रकार कोणत्याही कामानिमित्त ठाण्यामध्ये गेले असता उद्धट वागणूक व आरोपी सारखे प्रश्न केले जात होते. अवैध धंदे संबंधित माहिती दिल्यास किंव्हा माहिती विचारल्यास उलटा त्या व्यक्तीस प्रश्न केले जात होते. अशा विविध प्रकारच्या घटना कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये घटल्या जे वादग्रस्त ठरल्या. याबद्दल अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आले होते, मात्र याकडे दुर्लक्ष होत होते. मात्र धानोली तांडा प्रकरण या गावातील नागरिकांनी झालेल्या अन्याय वर पोलीस अधीक्षणाकडे न्याय मागण्या करिता गेले असता पोलीस अधीक्षक मुर्मुका सुदर्शन यांनी योग्य न्याय देत त्या ठाणेदार ची तडकाफडकी चंद्रपूर येथे बदली करण्यात आली.
मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे म्हणून ठाण्यात बोलवून एका युवकाला मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे कोरपना येथील ठाणेदाराची तक्रार करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत ठाणेदारांची तडका फडकी बदली करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी सात वाजता कोरपना चे ठाणेदार व सह कर्मचारी हे तांडा (धानोली ) येथील रमेश मूनावत यांचे घरी अवैध दारू विक्री करीत असल्याच्या अंदाज व्यक्त करत घराची झाडझडती घेतली. तेव्हा त्यांची लहान मुलगी घरी एकटीच उपस्थित होती. त्यादरम्यान रमेश मुनावत यांचे पुतने व तक्रारदार विपुल मूनावत यांनी घरी कोणीच नाही असे म्हणून सांगितले असता. तेव्हा ठाणेदारानी शासकीय कामात अडथळा आणू नको बजावले. त्याच्या काकाच्या घराची तपासणी केल्यानंतर त्यांचे घर कुठे आहे असे विचारत त्याच्या पण घराची झडती घेतली. मात्र तपासात काहीच मिळून आले नाही. त्यानंतर ठाणेदार यांनी विपुल मुनावत ला मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे म्हणून दिनांक 8 जूनला बोलावले. ठाण्याच्या आवारात पोहचताच विपुल मुनावत यांनी आपल्या मोबाईल मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. ठाणेदारांनी युवकाला केबिनमध्ये बोलावून एका शिपायाला पट्टा घेऊन येण्यास सांगून पन्नास फटके मार म्हणत शिवीगाळ केली. जवळपास अर्धा तास पट्ट्यांनी सूज येत पर्यंत झोडपल्यानंतर ठाणेदारांनी बहिण व आई विषयी अश्लील शिवीगाळ केली. तसेच दवाखान्यात गेल्यास पुन्हा चोप देईल अशी धमकी देऊन गावी पाठवले. गावकऱ्यांनी त्यानंतर दवाखान्यात नेऊन वैद्यकीय तपासणी उपचार करून घेतले. त्यानंतर झालेल्या अत्याचाराची चौकशी करून कारवाईची मागणी तक्रारीतून करण्यात आली. या अनुषंगाने तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित ॲक्शन घेत सोमवारी कोरपना येथील ठाणेदार संदीप एकाडे नियंत्रन कक्षात बदली केली व कोरपना येथे नवीन ठाणेदार म्हणून अजिंक्य तामडे यांची नियुक्ती केली आहे. ते रुजू सुद्धा झाले आहे.
नवीन ठाणेदारांना अवैध रेती तस्कराचे आव्हान
सध्या कोरपणा मार्गे गडचांदूर जिवती राजुरा या शहराकडे तेलंगणातून अवैध रेती मोठ्या प्रमाणात 25 ते 30 हायवे बेधडकपणे रात्री सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत आहे मात्र आजपर्यंत या हायवा गाडीवरती कारवाई न होणे हा संशोधनाचा विषय ठरत आहे मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अजिंक्य तराडे यांनी कोरपणा पदभार सांभाळले असून आता हे अधिकारी कोणती अवैध रेती तस्करावरती कारवाई करतील का याकडे तालुका वासी यांचे लक्ष लागले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #korpana #PoliceStationKorpana #SuperintendentofPolicechandrapur #SubDivisionalPoliceOfficer #Illegalsand
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.