आदिवासी नेते वाघुजी गेडाम यांनी केली मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ जून २०२४) -
खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना जिल्ह्यात बियाणांचा कृत्रिम तुडवडा जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे दोन पाकिटापेक्षा जास्त बियाणे मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा राग समोर येत आहे. शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे, तर काही भागांत मान्सूनपूर्व लागवड होत असल्याने काही बियाण्यांची मागणी वाढली आहे. मात्र शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे मुबलक प्रमाणात मिळत नसल्यामुळं मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा आदिवासी नेते तथा भाजप किसान आघाडी राजुरा विधानसभा समन्वयक वाघुजी गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांनी वाघुजी गेडाम याना सांगितले की, कृषी केंद्राकडून मागणी केलेल्या बियाणांची अर्धवट पाकिटं दिली जात आहेत. कृषी केंद्र संचालक ऐन खरीप हंगामात बियाण्यांची काळाबाजारी करीत तर नाही आहे ना अशी शंका हि शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
"ऐन हंगामात बियाणांचा तुटवडा निर्माण होणं, शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरत आहे. कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळं आणि व्यापाऱ्यांचं साटंलोटं असल्यामुळं मुद्दाम तुटवडा निर्माण केला जात आहे," असा आरोप वाघुजी गेडाम यांनी केला आहे.
“शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे मिळत नाही. पण व्यापाऱ्यांकडून हे मुद्दाम केलं जात आहे. ही परिस्थिती नवीन नाही. गेल्या चार-पाच वर्षात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर सोबत दुसऱ्या कंपनीचे वाण घेण्याचीही सक्ती केली जाते” असाही आरोप गेडाम यांनी लावला. शासनाने शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वाघुजी गेडाम यांच्या समवेत शेतकऱ्यांनी केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #khariphangam #Kharifseason #farmers #agriculture #Shortageofseedsrequiredbyfarmers #Artificialcrushingofseeds #DepartmentofAgriculture #krushikendra #Premonsoonplanting #BJP #waghujigedam
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.