आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ जून २०२४) -
तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला वा नागरिक हे शासकीय, निमशासकीय कामा करिता तालुका मुख्यालयी येत असतात. तहसील, बँक, रुग्णालय, पोलीस स्टेशन वा कोणतेही शासकीय-निमशासकीय कार्यालय असो या कार्यालयात हेलपाट्या मारल्याशिवाय वा चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नसतात. या ना त्या कारणाने शासकीय कर्मचारी नागरिकांच्या कामांना रेंगाळत ठेवतात. तालुक्यातील नागरिकांची कामे त्वरित व्हावी, त्यांच्यावर चिरीमिरी देऊन कामे करवून घेण्याची वेळ येऊ नये याकरिता सृजन नागरिक मंच ने पुढाकार घेतला असून स्थानिक वन उद्यानात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुंडलिक उराडे हे होते. सभेत प्रामुख्याने समाजसेवक मिलिंद गड्डमवार, जेष्ठ पत्रकार अनिल बाळसराफ, प्रभाकर चन्ने, दीपक शर्मा, राजू येरावार आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक पुंडलिक उराडे यांनी तहसील कार्यालय, महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, बँक, पंचायत समिती, नगर पालिका, सेतू सेवा केंद्र, पोलीस, बाजार समिती, विविध संस्थेद्वारे नागरिकांची पिळवणूक केल्या जाते. नागरिकांची शासकीय स्तरावरील विविध कामे कश्या प्रकारे सोडविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. अनिल बाळसराफ यांनी यापुढे कश्याप्रकारे कामे करावी लागणार आहे याबाबत माहिती मांडली, सध्या व्यापारी वर्ग ऑनलाईन व्यवसायाने परेशान आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसाय कसा वृद्धिगत होईल याबाबतही या बैठकीत विचार विमर्श करून पर्याय उपलब्ध करून द्यावयाचे होते मात्र बैठकीत एकही व्यापारी उपस्थित नसल्याने तूर्तास हि बाजू स्थगित करण्यात आली. प्रस्ताविक व आभार मिलिंद गड्डमवार यांनी केले. नागरिकांनी त्यांच्या काही समस्या असल्यास सृजन नागरिक मंचच्या निदर्शनास आणून द्याव्यात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जाणार असल्याचे मिलिंद गड्डमवार यांनी सांगितले. जनतेने आपल्या प्रश्नाबाबत सृजन नागरीक मंचचे मिलींद गड्डमवार, ग्राहक मंचाचे प्रभाकर चन्ने, पत्रकार दिपक शर्मा यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #sahavicharsabha #Consensusmeeting #Governmentsemigovernmentwork #Helpatya #chirmiri #TehsilOffice #RevenueDepartment #ForestDepartment #AgricultureDepartment #Bank #PanchayatSamiti #MunicipalCorporation #SetuSevaKendra #Police #MarketCommittee #VariousInstitutions #Students #Farmers #FarmLabourers #Womens #Citizens #SrujanCitizenForum #srujannagrikmanch #ForestPark #vanudyan #Onlinebusiness #businesman #milindgaddamwar
आपणं समाजातील प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत आहात.याबद्दल सृजन नागरिक मंच राजुरा आपले आभारी आहे.
उत्तर द्याहटवा