Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ॲड.इंजी. प्रशांत घरोटे यांच्या प्रयत्नांनमुळे राशन कार्ड धारकांना दिलासा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०3 जून २०२४) -         राजुरा तालुक्यातील नवराशन कार्ड धारकांना, नवीन राशन कार्ड बनविल्यानंतर कुठल्याही...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०3 जून २०२४) -
        राजुरा तालुक्यातील नवराशन कार्ड धारकांना, नवीन राशन कार्ड बनविल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्यावर राशन उपलब्ध न होता केवळ एक शोभेची वस्तू म्हणून देण्यात आलेले होते. वर्ष 2019-20 पासून चे सर्व अशा प्रकारचे नवीन राशन कार्ड धारकांना तहसील कार्यालयातून कार्ड तर बनऊन देण्यात आले होते परंतु अन्नधान्याचे वाढीव निष्ठांक चे मंजुरी चे अभावी यावर लाभ धारकांना राशन उपलब्ध करून देण्यात येत नव्हते.

      गरजू लाभ धारकांनी ही समस्या भाजपा तालुका महामंत्री तथा संघर्ष युवा विकास मंडळ साखरी चे सचिव ॲड.इंजी. प्रशांत घरोटे यांचे पर्यंत पोचवताच त्यांचे माध्यमातून राजुरा चे तहसीलदार आणि जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचे स्तरावर वैयक्तिक पाठपुरावा आणि मा. हंसराज अहिर अध्यक्ष एनसीबीसी यांचे माध्यमातून पत्रचार करून प्रशासनाला तालुक्यासाठी वाढीव निश्ठांक मंजूर करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर वर्ष 2019 पासून 2023 पर्यंतचे सर्व प्रलंबित राशन कार्ड धारकांना राशन उपलब्ध होणे सुरू झाले. त्यामुळे यासर्व गरजू लाभार्थ्यांना नियमित वाटप आणि केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेतून मोफत वाटप हा दुहेरी लाभ उपलब्ध झालेला आहे.

        उल्लेखनीय आहे की राज्यामध्ये शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार येण्यापूर्वी जिल्ह्यात अशी परिस्थिती होती की नव राशन कार्ड धारकांना राशन तर दूरची गोष्ट, रेशनकार्ड सुद्धा उपलब्ध होत नव्हते त्यामुळे यासाठी गरजूनचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुद्धा काही महिन्यांसाठी बंद होती आणि त्याबाबत सुद्धा ॲड.इंजी. प्रशांत घरोटे यांनी वैयक्तिक आणि मा. हंसराज अहिर, अध्यक्ष एनसीबसी यांचे माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे राशन कार्ड उपलब्ध होणे सुरू झाले होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #rashancard #Tahsilofficerajura #tahasildarrajura #DistrictFoodSupplyOfficerChandrapur #HansrajAhir #prashantgharote #Rationcard

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top