Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राज्यस्तरीय एथलेटिक्स अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2024
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रवीण व पूनम कडे चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 28 मे 2024) -          महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना ...

प्रवीण व पूनम कडे चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 28 मे 2024) - 
        महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित 72 वी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा नागपूर येथे विद्यापीठ मैदानात दिनांक 1 ते 3 जून 2024 रोजी आयोजित केलेली आहे. सदर स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटनेद्वारे अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 11 व 12 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे करण्यात आले होते, सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातर्फे प्रवीण राठोड व पूनम गिरडकर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघात खेळाडू सदस्य म्हणून 100 व 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रवीण राठोड, वैभव चौधरी, राजेश सुनामी, 200 मीटर धावणे स्पर्धेत जय मडावी, चेतन बोरकुटे, कैलास चिमूरकर, 800 मीटर धावणे स्पर्धेत नागेश अजमेरा, 5000 मीटर धावणे स्पर्धेत अनुराग बत्तलवार, 10000  मीटर धावणे स्पर्धेत अमन करमणकर, शिवाजी गोस्वामी, 110 मीटर हार्डल स्पर्धेत भावेश राचरलावर, गोळा फेक व भालाफेक स्पर्धे आदित्य केमेकर, थाळीफेक स्पर्धेत प्रणय खेरे, लांब उडी स्पर्धेत सागर पवार, तसेच 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत रितिक दुधारे सहभागी होतील.  महिला गटात 100 मीटर व 200 मीटर धावणे स्पर्धेत पुनम गिरडकर, 400 मीटर धावणे स्पर्धेत जानवी हजारे, गोळा फेक स्पर्धेत ईशा धावेकर, थाळी फेक स्पर्धेत नितिषा गौरकार हे खेळाडू सहभागी होतील तसेच प्रशिक्षिका पूर्वा खेरकर व संघ व्यवस्थापक चैताली कन्नाके काम पहातील.

        राज्यस्तरीय स्पर्धेकरिता जिल्हा संघाची निवड जिल्हा सचिव सुरेश आडपेवार व स्पर्धाप्रमुख कु.पूर्वा खेरकर, प्रा.संगीता बांबोडे, रोशन भुजाडे, श्री मयूर खेरकर, कु.प्रियंका मांढरे, विजय भगत यांच्या समितीद्वारा करण्यात आली. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, मकरंद खाडे, प्रकाश तुमाने, अनिल ददगाल डॉ.सुनील डाखोरे यांनी विजयी होण्याकरिता व जिल्ह्याचे नाव लौकिक करण्याकरिता शुभेच्छा दिल्या. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #sports #chandrapur #rajura #Athletics #Statelevelathleticssportscompetition #MaharashtraStateAthleticsAssociation #72ndStateLevelAthleticsSportsCompetitionNagpur #Universitygrounds #DistrictSportsComplexChandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top