Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दहावीच्या निकालात भारत विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भार्गवी बोरकर ९७.२० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरी आमचा विदर्भ - दीपक शर्मा नवरगाव (दि. २७ मे २०२४) -         सिंदेवाही तालुक्यातील न...

भार्गवी बोरकर ९७.२० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवरगाव (दि. २७ मे २०२४) -
        सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारतीय शिक्षण संस्था संचालित भारत विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ठ लागला असून शाळेचा निकाल ९५.३४ टक्के लागलेला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून शाळेतील विद्यार्थीनी भार्गवी बोरकर ९७.२० टक्के गुण प्राप्त करित अव्वल स्थान पटकाविले आहे.

        दहावीचा निकाल सोमवार ला घोषीत करण्यात आला. या निकालात नवरगावच्या भारत विदयालयाचा ९५.३४ टक्के निकाल लागला असून प्राविण्य श्रेणीत एकूण ११६ तर प्रथम श्रेणीत एकूण ७५ विद्यार्थ्यांनी निकाला बाजी मारली. मागील कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात अव्वल स्थान पटकाविण्याची परंपरा कायम राखली आहे. शाळेत ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविण्यात एकूण ३१ विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे . 

        शाळेतून प्रथम स्थान भार्गवी अनिल बोरकर ९७.२० टक्के, द्वितीय स्थान संस्कृती संजय नाकाडे ९६.८० टक्के तर ९६.०६ टक्के गुण प्राप्त करीत तृतीय स्थान अदिती गुरुदेव कामडी व जानवी शशिकांत बोडणे ह्यांनी पटकावित दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई वडील, महाविद्यालयातील शिक्षक यांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर आणि सचिव सदानंद बोरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शैवाली वैद्य व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विदयार्थ्यांचे कौतूक केले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #sindewahi #nawargao #education
#MaharashtraStateBoardofSecondaryandHigherSecondaryEducation #bhartiyashikshansanstha #bharatvidyalayas

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top