Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इयत्ता दहावी परिक्षेत इन्फंट काँन्व्हेंट चा उत्कृष्ट निकाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २७ मे २०२४) -         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ मे २०२४) -
        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. इयत्ता १० वी च्या निकालात इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील इयत्ता १० वी स्टेट बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून शाळेतून निशांत निलकंठ गोहने ने ९३% गुणासह प्रथम, हितेश चंद्रकांत जयपूरकर ने ९१.६०% गुणासह द्वितीय, सुमित संजय जुनघरी ने ९१% गुणासह तृतीय, तन्मय सुरेश भटारकर ने ९०% गुणासह चौथा तर सम्यक विजय फुलझेले ने ८९.६०% गुणासह पाचवा क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत एकुण ६० पैकी विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी ५० तर प्रथम श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गणित व मराठी मध्ये ८ विज्ञानामध्ये ६ व सामाजिक शास्त्रात १४ विद्यार्थीनी ९० च्या वर गुण प्राप्त केलेले आहे.

        विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #education
#subhashdhote #infantconvent #MaharashtraStateBoardofSecondaryandHigherSecondaryEducation

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top