आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 28 मे 2024) -
सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या युगात संधीचे सोने करून स्वतः ला सिद्ध करण्याची वेळ विद्यार्थ्यांनी सोडू नये. स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असून विविध क्षेत्रात आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवड करून आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी केले. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभ्यासिका (ग्रंथालय) राजुरा च्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष साजिद बियाबानी, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड, अरुण मस्की, सतीश धोटे, सुदर्शन दाचेवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, उप प्राचार्य डॉ. राजेश केरानी, हरजित सिंग, डॉ. अर्पित धोटे, अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा पोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी राजुरा तालुक्यातील इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अविनाश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार प्रा.बी.यू. बोर्डेवार यांनी मानले. या प्रसंगी 75 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी मोठ्यासंख्येने विद्यार्थी, पालक व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #sports #chandrapur #rajura #srudents #AdvSanjayDhote #MeritoriousstudentsofclassXIIfelicitated #KarmaveerDadasahebKannamwarLibrary #SudarshanNimkar #aadarshshikshanprasarakmandalrajura #AvinashJadhav #SatishDhote #Parents #principals #teachers #education
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.