Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचिरोली जिल्हयामध्ये अवैधरित्या वाहतुक होणारी लाखोची देशी दारू जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपुर (दि. १७ मे २०२४) -         पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपुर (दि. १७ मे २०२४) -
        पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना दिले आहेत, त्या अनुषंगाने स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

        त्यावरून दिनांक १७ मे २०२४ ला सपोनि गदादे, पोउपनि भुरले व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, मुल परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, एक महिद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३३ टि. २०१४ मध्ये अवैधरित्या देशी दारूची पोस्टे मुल परिसरातील चिरोली ते सुशी मार्गाने गडचिरोली जिल्हयात वाहतुक करीत आहे अशा खबरे वरून नाकाबंदी करून वाहनास ताब्यात घेवुन नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता, वाहनामध्ये २५० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग प्रमाणे एकुण २५,००० नग देशी दारू राकेश संत्रा कंपनीच्या प्रत्येकी ९० एम.एल. ने सिलबंद भरलेल्या प्रत्येकी ३५/- रू. प्रमाणे एकुण किमंत ८,७५,०००/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३३ टि. २०१४ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण १५,७५,०००/- रूपयाचा माल जप्त केला. आरोपी नामे करणसिंग ओमकारसिंग पटवा, वय-२९ वर्ष, रा. गुरुव्दार जवळ, मुल, चंद्रपुर २) मनोजकुमार जगदीश मुजुमदार, वय ३९ वर्ष, रा. बंगाली कॅम्प, एटापल्ली, जि. गडचिरोली यांना वाहतुक करीत असतांना मिळालेल्या देशी दारू बाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर देशी दारूचा माल हा नामे अमोल रामदास ढोरे, रा. मुल, चंद्रपुर याचे मालकीचा मौजा चिरोली ता. मुल, जि. चंद्रपुर येथील देशी भट्टी मधुन चार चाकी वाहनामध्ये भरून दिल्याचे सांगितले आहे.

        सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, सपोनि पंकज बोनसे, सपोनि मनोज गदादे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा / ८९८ जयंता चुनारकर, पोहवा /११७६ किशारे वैरागडे, पोहवा/२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, नापोशि/१२२७ चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #chandrapur #nagpur #mul
#gadchiroli #Illegalcountryliquorseized
#superintendentofpolicechandrapur #Patrolling
#localcrimebranch #lcb #Illegalbusiness
#Fourwheelervehicles

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top