Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारतीय मसाल्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मसाल्यांची बदनामी मोहरीच्या तेलावर काही देशांनी बंदी आमचा विदर्भ - दीपक शर...

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मसाल्यांची बदनामी
मोहरीच्या तेलावर काही देशांनी बंदी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नागपूर (दि. १७ मे २०२४) -
        विदर्भातील मसाल्यांची बाजारपेठ मोठ्या उलाढालीची असून याद्वारे हजारो हातांना रोजगार मिळत आहेत. आजघडीला वेगवेगळे ५० ब्रॅण्ड बाजारात आहेत. भारतातील मसाला उद्योगाला असलेली मागणी पाहता विदेशी शक्तींद्वारे या उद्योगाच्या बदनामीचे षडयंत्र सुरू आहे, असा दावा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी)ने केला आहे.

        देशविदेशातील ग्राहकांचा भारतीय मसाल्यांवर विश्वास निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात विक्रीसुद्धा वाढली आहे. यामुळे विदेशी कंपन्या संकटात सापडल्याने विविध षडयंत्र रचून या उद्योगाला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मुळात भारतीय मसाले आणि खाद्यपदार्थांच्या निर्यातीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असताना चीनकडून चूकीचा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. यापूर्वी मोहरीच्या तेलावर काही देशांनी बंदी घातली होती. भारतीय तांदूळ आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या किंवा मासे यांच्याकडेही संशयाने बघितले जात होते. एफएसएसएआयकडून मसाले आणि खाद्यपदार्थांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असल्याने ग्राहकांनी आमच्या उत्पादनावर विश्वास ठेवायला हवा, असेदेखील आवाहन व्यापाऱ्यांद्वारे करण्यात येत आहे.

        आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मसाल्यांची बदनामी करून चीनसारखे देश भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मसाल्यांच्या निर्यातीतून सरकारला मोठ्या प्रमाणावर परकीय चलनही मिळते. यामुळे अनेक देश दुखावत आहेत, त्यामुळे विविध आरोप करून परदेशात भारतीय मसाल्यांची बदनामी केली जात आहे, असा दावा एनव्हीसीसीचे अध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी केला आहे. उपाध्यक्ष फारुख अकबानी यांनीदेखील या प्रकारच्या बदनामीमागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा केला. यावेळी सचिव शब्बर शाकीर, राजवंतपाल सिंग तुली, दीपक अग्रवाल आणि जनसंपर्क अधिकारी हेमंत सारडा यांनी भारतीय मसाल्यांबाबत करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #india #chandrapur #nagpur
#spiceindustry #nagvidarbhachamberofcommerce
#badreputationofindianspicesininternationalmarket
#anattempttotarnishindia'simage
#foreignexchange #China #spice

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top