Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कसोशीने प्रयत्न केले तर यश नक्कीच - मनोज पावडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रियदर्शनी विद्यालय रामपूरचे सुयश गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २९ मे 2024) -         कोणतेही प्रयत्...

प्रियदर्शनी विद्यालय रामपूरचे सुयश
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ मे 2024) -
        कोणतेही प्रयत्न हे वाया जात नाहीत. यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पालक व शिक्षकांचेही तेवढेच योगदान मिळायला हवे. विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करत राहावे यश नक्कीच आपल्या पदरी पडते असे मत मुख्याध्यापक मनोज पावडे यांनी शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २४ च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना व्यक्त केले.

        प्रियदर्शनी विद्यालय रामपूर येथिल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०) मार्च २४ च्या परीक्षेला ३९ विद्यार्थी बसले होत यात ३८ विद्यार्थी उतिर्ण झाले. यामध्ये प्रतिक्षा श्रीधर उरकुडे या विद्यार्थिनिने ८३.६० टक्के घेत प्रथम, श्रुती मोरेश्वर विरुटकर ८३ टक्के घेत द्वितीय, अनुराधा रविंद्र डाखरे ८२ टक्के घेत तृतीय तर लक्ष्मी रविंद्र लांडे ८० टक्के घेत चौथा क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत सत्कार केला.

        यावेळी विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज पावडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोबडे, रामपूर गावच्या सरपंच निकिता झाडे, ग्राम पंचायतीचे सदस्य लटारी रोगे, संगीता दुधे, रेखा अत्राम, माजी सदस्य रमेश झाडे, शिक्षक ममता नंदुरकर, महेंद्र मंदे, राजेश वाघाये, श्रीकृष्ण गोरे, प्रफुल ठाकरे यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. विद्यालयातील इयत्ता १० परीक्षा उतिर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #education #PriyadarshiniVidyalayaRampur
#MaharashtraStateBoardofSecondaryandHigherSecondaryEducation #vidyashikshanprasarammandal #rampur #Meritoriousstudentsfelicitated #Principal #ManojPavde

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top