Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजचा उत्कृष्ट निकाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २९ मे 2024) -         राजुरा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बापूजी मामुलकर पाटील...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ मे 2024) -
        राजुरा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बापूजी मामुलकर पाटील स्मृती प्रतिष्ठान राजुरा द्वारा संचालित स्थानिक सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा उत्कृष्ट निकाल लागला. प्रथम क्रमांक भाविक गुलाब उपरे ८५.८०, द्वितीय क्रमांक श्रावणी विनायक भानोरकर ८५.००, तृतीय क्रमांक प्राची प्रभाकर चंदनखेडे ८४.४० यांनी पटकविला. या परीक्षेत एकूण ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश जाधव, सचिव ॲड. अरुण धोटे, उपाध्यक्ष दत्तात्रय येगिनवार, कोषाध्यक्ष सुदर्शन निमकर, संचालक डा.एस.एम.वरकड, सहसचिव प्रा.बी.यू. बोर्डेवार, कॉन्व्हेन्टच्या प्राचार्या कृतिका सोनटक्के, मुख्याध्यापिका शबनम अन्सारी, उपप्राचार्या रफत शेख यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #education
#MaharashtraStateBoardofSecondaryandHigherSecondaryEducation #SoniaGandhiEnglishPublicSchoolandJuniorCollege #BapujiMamulkarPatilMemorialFoundationRajura #AvinashJadhav #ConventPrincipal

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top